डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 3, 2024 2:29 PM | Aditya-L1

printer

भारताच्या पहिल्या सौर यान आदित्य एल-1ची एल-1 बिंदू भोवतीची पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल वन यानानं अंतराळात पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या लॅग्रेंज पॉइंट एल वन  इथं आपली पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आदित्य एल वन नं आपल्या दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेतलं स्थानांतरण यशस्वीरीत्या केल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोनं सांगितलं. आदित्य-एल वन ही एक अवकाश वेधशाळा असून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतानं आखलेली ही पहिली सौर मोहीम आहे.