डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला तिसऱ्या पदकाची संधी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आगेकूच केली. नेमबाजीत दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात ५९० गुण कमावून अंतिम फेरीत दाखल झाली. त्यामुळे तिला या स्पर्धेत तिसरं पदक मिळवण्याची संधी आहे.

 

तिरंदाज अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवर यांनी स्पेनला ३-५ असं नमवून उपांत्य फेरी गाठली. हॉकीत भारताच्या पुरुष संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघावर ३-२ अशी मात केली. दरम्यान, नौकानयन स्पर्धेत विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमनन, तर गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर आज आपापले सामने खेळतील.

 

बॅडमिंटनमध्ये भारताचा एकमेव खेळाडू लक्ष्य सेन याचा सामना पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चौ तेइन चेन याच्याशी होणार आहे. याशिवाय अंकिता ध्यानी आणि पारुल चौधरी महिलांच्या ५ हजार मीटर शर्यतीत, तर तजिंदरपाल सिंह तूर पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत उतरणार आहेत.