दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्या चालवत आहे. चेन्नईमधून १८ लाखापेक्षा जास्त प्रवासी उत्तरप्रदेश आणि बिहारला जात आहेत, त्यामुळे तामिळनाडू परिवहन विभागानं वीस हजारापेक्षा जास्त बसगाड्याही सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीतल्या रेल्वेस्थानकांची पाहणी केली. तिकीट खिडकी आणि शौचालयांची सुविधा केल्यामुळे एकावेळी ७५ हजार प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करणं शक्य झाल्याचं वैष्णव म्हणाले. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही सणाच्या काळात वाढली आहे.
Site Admin | October 19, 2025 2:57 PM | Diwali | indianrail
दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय रेल्वेची उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्यांची सुविधा