डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 4, 2024 8:45 PM | Indian Railway

printer

भारतीय रेल्वेची १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना

भारतीय रेल्वेनं पुढच्या दोन वर्षांसाठी सुमारे १० हजार विना-वातानुकूलित डब्यांच्या उत्पादनाची योजना आखली आहे. त्यात ५३०० पेक्षा जास्त सामान्य डबे असतील, असं अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सांगितलं. रेल्वेचे प्रवासी वाढत असून त्यामुळे डब्यांची आवश्यकताही वाढली आहे. त्यामुळे डब्यांचे उत्पादनही वाढवत असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं.