रेल्वेनं प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते उद्यापासून लागू होणार आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवास भाड्यात पहिल्या २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यानंतर द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या किलोमीटर मागे १ पैसा तर एक्स्रप्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना प्रति किलोमीटर २ पैसा भाडेवाढ लागू होईल. वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांनाही प्रति किलोमीटर २ पैसे अतिरीक्त द्यावे लागतील. यामुळे ५०० किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं १० रुपयांनी वाढणार आहे. तर वातानुकुलित श्रेणीतल्या प्रवासांना २० रुपये अतिरीक्त द्यावे लागतील.
लोकल आणि मासिक पासच्या दरात काहीही बदल केलेला नाही, असं रेल्वेनं जाहीर केलं आहे.