भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न

भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. रेल्वे मंत्रालयानं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे १२३ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये १३५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त मालवाहतूक झाली आहे. त्यात ६० दशलक्ष टन कोळसा, १५ दशलक्ष टनांहून अधिक लोह खनिज, ७ दशलक्ष टन सिमेंट आणि ४ दशलक्ष टनांहून अधिक अन्नधान्याचा समावेश आहे.