भारतीय रेल्वेनं सकलेशपूर-सुब्रमण्य रोड घाट विभागाचं विद्युतीकरण पूर्ण करून एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. हा विभाग भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वात कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भूभागांपैकी एक आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे या प्रदेशात रेल्वे जोडणी, कार्यक्षमता तसंच शाश्वतता सुधारेल. आता वंदे भारत गाडी या मार्गावरून मंगळुरूपर्यंत धावू शकेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या यशाच्या परिणामाबाबत भाष्य करताना म्हंटलं आहे.