भारतीय रेल्वेनं देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सुमारे ९९ टक्के ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण केलं आहे. २०१९ ते २०२५ या कालावधीत ३३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीत करण्यात आलेलं एकूण विद्युतीकरण हे जर्मनीच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्क एवढं असून, स्वच्छ आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीच्या दिशेनं देशानं केलेल्या मोठ्या विस्ताराचं प्रतीक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | December 14, 2025 6:52 PM | Indian Railway
देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ९९ टक्के ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण