October 20, 2025 3:03 PM | Indian Railway

printer

१ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांचा विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवास

देशभरात गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९९८ मध्य रेल्वेकडून, त्याखालोखाल १ हजार ९१९ उत्तर रेल्वेकडून तर दीड हजार गाड्या पश्चिम रेल्वेकडून सोडण्यात आल्या होत्या. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी १२ लाख रेल्वे कर्मचारी अव्याहत काम करत असल्याचं रेल्वे मंत्रालयाने आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.