समाज माध्यमांवरून रेल्वे सेवेबाबत दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. या सणासुदीच्या काळात समाज माध्यमांवरच्या काही संकेतस्थळांवरून जुने आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारित झाल्यानं प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचं रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | October 18, 2025 8:07 PM | Indian Railway
रेल्वेसेवेबाबत दिशाभूल करणारे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई