डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 28, 2025 3:01 PM | Indian Railway

printer

भारतीय रेल्वेने १३० किमी प्रति तास वेग वाढवण्यासाठी २३,००० किमी मार्गिका केल्या अद्ययावत

भारतीय रेल्वेने २३ हजार किलोमीटरच्या मार्गिका अद्ययावत केल्या असून यामुळे रेल्वे १३० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्यासाठी मदत होणार आहे. तसंच ११० किलोमीटर प्रति तास वेगानं रेल्वे धावू शकणाऱ्या ५४ हजार किलोमीटर मार्गिकाही अद्ययावत केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. यामुळे विविध प्रदेश रेल्वेने जोडले जाणार असून रेल्वेची कार्यक्षमता वाढणार आहे. वेग वाढवण्यासाठी मार्गिकांचं अद्ययावतीकरण, प्रगत सिग्नल यंत्रणा, आणि धोका टाळण्यासाठी कुंपण बसवून रेल्वे मार्गिकांचं आधुनिकीकरण करण्यात येत असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर महिन्यादरम्यान रेल्वेच्या कमाईत चार टक्के वाढ झाल्याचंही रेल्वे मंत्रालयानं सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.