टपाल विभागानं पुढील पिढीच्या ए पी टी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. ए पी टी प्रणालीची रचना सुयोग्य अनुभव, वेगवान सेवा वितरण आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे.
ही सुधारित प्रणाली दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये येत्या सोमवारपासून अंमलात येणार आहे. ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी दिल्लीमधल्या काही प्रमुख टपाल कार्यालयांमधलं कामकाज सोमवारी जनतेसाठी बंद राहणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे.