भारत हा जगभरातला तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप हब असल्याचं गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ऑफ स्पेन इथं काढले. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना ते बोलत होते. तत्पूर्वी विमानतळावर त्यांचं उत्साहात
स्वागत करण्यात आलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधल्या भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा असून आपले पूर्वज भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत असंही ते म्हणाले. त्रिनिनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड साठी पात्र ठरतील अशी घोषणाही त्यांनी केली. या कार्डामुळे भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतात राहण्यास आणि काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. कॅरेबियन द्विपसमूहात सर्वप्रथम आर्थिक व्यवहारात यूपीआय प्रणालीचा वापर केल्याबद्दल मोदी यांनी त्रिनिनाद आणि टोबॅगोचं कौतुक केलं आहे.