भारतीय नौदलात लढाऊ नौका उदयगिरी आणि आयएनएस तमाल या दोन जहाजांचा समावेश केला आहे . प्रोजेक्ट १७ए स्टिल्थ फ्रिगेटमधील दुसरं जहाज असलेलं उदयगिरी काल भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आलं. हे जहाज पारंपारिक आणि अपारंपारिक अशा दोन्ही धोक्यांना तोंड देण्याकरता सक्षम आहे. दरम्यान, भारतीय नौदलाने रशियातील कॅलिनिनग्राड इथल्या यंतर शिपयार्ड इथे आयएनएस तमाल जहाज तैनात केलं आहे. आयएनएस तमाल ही युद्धनौका ब्रह्मोस हे लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र आणि हमसा-एनजी सोनार प्रणालीने सुसज्ज आहे; समुद्रात एक शक्तिशाली हालचाल करणारा किल्ला म्हणून तमाल उभं राहिलं आहे.
Site Admin | July 2, 2025 9:34 AM
भारतीय नौदलात लढाऊ नौका उदयगिरी आणि आयएनएस तमाल या दोन जहाजांचा समावेश