भारतीय नौदलाच्या नेतृत्वात तिनही सेनादलांच्या संयुक्त सरावाला सुरुवात झाली आहे. त्रिशूल असे नाव देण्यात आलेला हा सराव गुजरातच्या किनारपट्टीवर आणि राजस्थानच्या वाळवंटात 13 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तिनही सेनादलांच्या कार्यपद्धतीमधलं प्रमाणीकरण निश्चित करणं आणि समन्वय साधणं यासाठी हा सराव आयोजित केला आहे. या सरावाद्वारे गुप्तहेर यंत्रणा, दक्षता यंत्रणा आणि सायबर युद्ध, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि टेहळणी याबाबतची कार्यपद्धतीदेखील प्रमाणित केली जाणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | November 3, 2025 10:04 AM
भारतीय नौदलाच्या नेतृत्वात तिनही सेनादलांचा संयुक्त सराव