नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून वाईस ऍडमिरल क्रिष्णा स्वामीनाथन यांनी आज पदभार स्वीकारला. वाईस ऍडमिरल संजय सिंग चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर स्वामिनाथन रुजू होणार आहेत. पदभार स्वीकारताच स्वामीनाथन यांनी मुंबईमधल्या नेवल डॉकयार्ड इथल्या गौरव स्तंभावर देशासाठी बलिदान देणाऱ्या नौदल सैनिकांना आदरांजली वाहिली. वाईस ऍडमिरल स्वामीनाथन १ जुलै १९८७ ला भारतीय नौदलात रुजू झाले, ते संप्रेषण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून त्यांना विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदकांनी गौरवण्यात आलं आहे.
Site Admin | July 31, 2025 8:01 PM
नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून वाईस ऍडमिरल क्रिष्णा स्वामीनाथन यांनी पदभार स्वीकारला