कॅनडातील भारतीय महिलांना संकटकाळी मदत करण्यासाठी टोरंटो शहरातील भारतीय दुतावासाने विशेष मदत केंद्र सुरू केले आहे. दूतावासानं महिलांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाइन सेवा देखील सुरू केली आहे. भारतीय पारपत्रधारी महिलांना कौंटुबिक हिंसा, छळ तसंच कायदेशीर समस्या सोडवणुकीसाठी ही हेल्पलाइन कार्यरत असेल. हे केंद्र एक महिला प्रशासकाद्वारे हाताळण्यात येणार असून टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासातून काम करणार आहे.
Site Admin | December 27, 2025 7:57 PM
कॅनडातील भारतीय महिलांच्या मदतीसाठी दुतावासाचं विशेष मदत केंद्र सुरू