आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षेसंबंधीचे नियम विमानतळांवरच्या नियमांइतके कडक करावेत, सर्व रुग्णालयं सुरक्षित क्षेत्रं म्हणून घोषित करावी आणि योग्य ती सुरक्षाव्यवस्था त्यांना पुरवली जावी, असंही या पत्रात म्हटलं आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सखोल आणि ठराविक वेळेत पूर्ण व्हावी, तसंच पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई दिली जावी, डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने काम व्हावं, अशा मागण्या भारती वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केल्या आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.