महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं भारतीय कायद्यांमध्ये सुधारणा केली आहे, असं विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. महिलांशी संबंधित सायबर कायदे आणि सायबर जागरुकता या विषयावर नवी दिल्लीत आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित होत्या. डिजिटल जग मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाल्यानं महिलांची ऑनलाईन सुरक्षितता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची झाली आहे, असं त्या म्हणाल्या.