जर्मनी इथे होणाऱ्या ४ राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला. कर्णधार अराईजित सिंह हुंडल याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या २१ जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल. त्यानंतर २२ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि २४ जून रोजी स्पेनशी या संघाचा सामना होणार आहे.