भुवनेश्वर विमानतळावर भारतीय हॉकी संघाचं स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचं काल भुवनेश्वर विमानतळावर चाहत्यांनी आणि ओडिशा सरकारने भव्य स्वागत केलं. ओडिशाचे क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज, प्रधान सचिव भास्कर ज्योती सरमा आणि इतर सरकारी अधिकारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार तिर्की आणि खजिनदार सेकर जे मनोहरन देखील यात सहभागी झाले. दरम्यान, उत्कृष्ट बचावपटू ओडिशाचा अमित रोहिदास, याला मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव यांच्याकडून चार कोटी रुपयांचा विशेष रोख पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, “द वॉल” म्हणून ओळखला जाणारा भारताचा गोलरक्षक श्रीजेशला ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले, इतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळाले. केरळ सरकारने गोलरक्ष पी आर श्रीजेश याला २ कोटी रुपयांचं रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.