डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

युनायटेड किंग्डमच्या दंगलग्रस्त भागात प्रवास न करण्याची भारतीय उच्चायुक्तालयाची सूचना

युनायटेड किंग्डममधल्या गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या देशात प्रवासाला जाताना सतर्क राहून काळजी घेण्याचा सल्ला लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयानं दिला आहे.

 

भारतीयांनी युकेमध्ये येण्यापूर्वी इथल्या स्थानिक बातम्या आणि स्थानिक सुरक्षा संस्थांनी दिलेल्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि निदर्शनं सुरू असलेल्या भागात प्रवास टाळावा असं उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या सूचनेत नमूद केलं आहे. दरम्यान, भारतीयांनी लिबियामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा अशी सूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केली आहे.

 

लिबियामधल्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी, तिथल्या अंतर्गत भागात रस्त्यानं प्रवास करणं टाळावं असं मंत्रालयानं सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.