भारत सरकारने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या समाज माध्यमांवर बंदी घातली आहे. यापूर्वी मे महिन्यात भारतविरोधी प्रचार आणि प्रक्षोभक माहिती पसरवल्याबद्दल अनेक पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्या आणि समाज माध्यमं यांच्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.
यात अभिनेत्री सबा कमर, अहद रझा मीर, दानिश तैमूर, क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांच्यासारख्या अनेकांची खाती आहेत. त्याशिवाय पाकिस्तानातून प्रसारित होणारे ओटीटी प्लॅटफॉर्मस, मिडिया स्ट्रीमिंग सेवा, वेबसीरिज, चित्रपट, पॉडकास्ट आणि गाण्यांवरही बंदी घातली आहे.