पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर – मंत्री अदिती तटकरे

भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टिक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधांससह विविध विकास धोरणांबाबत शासनाच्या प्रस्तावांची रूपरेषाही यावेळी मांडली.