December 30, 2025 2:38 PM

printer

२०४७-४८पर्यंत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास

२०४७-४८ साला पर्यंत भारत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास करत असून, दरडोई उत्पन्न, १५ हजार डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजेच सध्याच्या जवळजवळ सहा पट राहील, असा अंदाज अर्न्स्ट अँड यंग च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दशकात आणि त्यापुढे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान मजबूत करण्यासाठी विकासाला चालना देणारे अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतील असं यात म्हटलं आहे. 

 

२०३० साला पर्यंत भारत, जर्मनी आणि जपानला मागे टाकून चीन आणि अमेरिकेनंतरची जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी अपेक्षा असून, येत्या काही दशकांमध्ये भारताचा विकासदर जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहील, असा अंदाज या अहवालात वर्तवला  आहे.