मुंबईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या (पश्चिम) प्रादेशिक मुख्यालयाला ॲडमिरल योशियो सेगुची यांनी दिली भेट

मुंबईतल्या भारतीय तटरक्षक दलाच्या (पश्चिम) प्रादेशिक मुख्यालयाला जपानच्या तटरक्षक दलाचे कमांडंट ॲडमिरल योशियो सेगुची यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह काल भेट दिली. यावेळी भारतीय तटरक्षक दल आणि जपानच्या नॅशनल स्ट्राइक टीम च्या वतीने समुद्रात होणाऱ्या धोकादायक रासायनिक गळतीचा सामना करण्यासाठी विशेष सरावाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दोन्ही एलिट स्ट्राइक टीमद्वारे वापरल्या जाणाऱ्या विशेष वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) आणि प्रदूषण प्रतिसाद गियरची ओळख करून दिली.
तसंच या शिष्टमंडळाने मेसर्स माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) च्या औद्योगिक भेटीत भाग घेऊन जहाज बांधणी क्षमतांवर चर्चा केली. या भेटीमुळे दोन्ही देशांची दीर्घकालीन सागरी भागीदारी मजबूत होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.