डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 5, 2025 1:17 PM | Indian Army

printer

मद्यधुंद सैनिकानं वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची बातमी खोटी !

नागपूरमध्ये एका मद्यधुंद सैनिकानं आपल्या वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरधन इथं रविवारी घडलेल्या घटनेचं वृत्तसंस्थानी चुकीचं वार्तांकन केलं, असंही लष्करानं स्थानिक पोलिसांकडून घटनेची खरी माहिती घेऊन स्पष्ट केलं आहे.

 

सध्या सुट्टीवर असलेला लष्करातला जवान रविवारी घरी परतत असताना पार्किंगवरून त्याचा स्थानिकांशी वाद झाला. नंतर त्याची चारचाकी झाडाला धडकून अपघात झाला होता. मात्र, या अपघातात कोणत्याही नागरिकाला इजा झाली नव्हती. या हवालदाराने त्याचा पाठलाग करणाऱ्या स्थानिकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचं लष्करानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा