डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 19, 2025 1:42 PM | Indian Army

printer

युद्धबंदी संपण्याची कोणतीही तारीख देण्यात आली नाही- भारतीय लष्कर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला शस्त्रसंधी काल संपल्याचा दावा करणारं वृत्त भारतीय लष्करानं फेटाळून लावलं.

 

भारत आणि पाकिस्तान यांच्या सैनिकी कारवाई महासंचालकांमधे १८ मे रोजी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, १२ मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता, शस्त्रसंधी संपण्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, असं लष्करानं स्पष्ट केलं.

 

या चर्चेत दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करू नये, एकमेकांंविरोधात कोणतंही आक्रमक वक्तव्य करू नये, असं ठरलं होतं. सीमाभागात तैनात केलेल्या सैन्यात कपात करावी असंही ठरलं होतं, असं लष्करानं सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा