डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 5, 2024 7:26 PM | Indian Army

printer

भारतीय लष्कराकडून येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत भरती रॅलीचं आयोजन

अग्नीवीर योजने अंतर्गत, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेल्या, महाराष्ट्रातल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांमधल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय लष्कराने येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विरारमधल्या जीवदानी मैदानावर भरती रॅली आयोजित केली आहे. भरती रॅलीचा हा दुसरा  टप्पा आहे. 

 

एप्रिल २०२४ मध्ये  ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेले सर्व धार्मिक गुरु  असलेले उमेदवार देखील या रॅलीला उपस्थित राहतील. भरती रॅलीमध्ये शारीरिक क्षमता चाचणी, कागदपत्रांची चाचणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश असेल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.