डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. आज सकाळी साडे दहा वाजता परेडने सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारताचे बाराशे सैनिक तसंच अमेरिकन लष्कराचे सैनिक सहभागी झाले आहेत. हा सराव पंधरा दिवस चालेल. या सरावा दरम्यान अमेरिकेच्या तोफखाना यंत्रणेचं प्रात्यक्षिण केलं जाणार आहे. दोन्ही लष्करांची क्षमता वाढवणं आणि गरज पडेल तेव्हा एकत्र काम करणं शक्य व्हावं यासाठी हा युद्ध सराव घेतला जात आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय लष्करी संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्वाचा मानला जात आहे.