December 15, 2024 8:20 PM

printer

बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियानं आपली स्थिती भक्कम केली. कालच्या २८ धावांवरून सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पहिले तीन बळी झटपट गमावले. 

 

७५ धावांवर तीन गडी गमावलेले असताना स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांच्या दमदार शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियानं तीनशे धावांचा टप्पा पार केला. स्टीव्हन स्मीथ १०१ धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर झेलबाद झाला तर ट्रॅविस हेड १५२ धावांची खेळी करून बुमराहच्याच चेंडूवर झेलबाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच गडी बाद केले. 

 

आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ७ बाद ४०५ धावा झाल्या होत्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.