November 9, 2025 9:58 AM | T20

printer

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. मालिकेतला निर्णायक पाचवा सामना काल पावसामुळं रद्द करावा लागला. त्यामुळं चौथा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघानं मालिका जिंकल्याचं घोषित करण्यात आलं. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. या विजयामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकण्याची गेल्या १७ वर्षांपासूनची परंपरा भारतानं कायम राखली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.