डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतीय महिला संघानं पटकावलं आशियाई कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद

महिला हॉकीत भारतानं कनिष्ठ गटातला आशियाई चषक पटकावला आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनाल्टी शूट आउटमधे चीनचा ३-२ असा  पराभव केला. भारतासाठी साक्षी राणा, इशिका आणि सुनेलिता तोप्पो या तिघींनी गोल केले. भारतीय गोलकीपर निधी हिनं तीन गोल वाचवले. गेल्या वर्षीही भारतीय महिला संघानं या स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. या स्पर्धेत भारताच्याच दीपिका शेरावतनं सर्वाधिक १२ गोल केले.