November 2, 2024 2:26 PM

printer

१९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

या स्पर्धेत आज महिलांच्या विविध वजनी गटात निशा, सुप्रिया देवी, पार्थवी ग्रेवाल यांच्यासह आणखी पाच जणी सुवर्णपदाच्या लढतीत सहभागी होतील, तर पुरुषांमध्ये हेमंत सांगवान ९० किलो वजनी गटात अंतिम सामना खेळणार आहे.