आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ४८ पदकांची कमाई

बहरीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

 

या स्पर्धेत भारताच्या २२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं, प्रीतीस्मिता भोई हिनं भारोत्तोलनात ४४ किलो वजनी गटात विक्रम प्रस्थापित करुन पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं, तर मुष्टियुद्ध आणि बीच रेसलिंग प्रकारात खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.