रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये कालच्या पहिल्याच दिवशी पाच सुवर्ण पदकांसह भारतानं 15 पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या पांच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रिन्स कुमारनं देशाला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. महिलांच्या पांच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या संजना सिंग हिनं सुवर्ण, तर सीमानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये समरदीप सिंग गिल यानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताच्या रवी कुमारनं दुसरा तर श्रीलंकेच्या स्पर्धकानं तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या योगितानं सुवर्ण तर शिखानं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या उंच उडी स्पर्धेमध्ये पूर्वा सावंतनं रौप्य पदक मिळवलं आहे.