१७व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूनं १ सुवर्ण आणि ४ रौप्यपदकांना गवसणी घातली आहे. १७ ते २६ ऑगस्टदरम्यान ब्राझिलची राजधानी रिओ दी जानेरो इथं झालेल्या या स्पर्धेत बंगळुरूचा दक्ष तयालिया यानं सुवर्ण, तर पुण्याचे आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादचा बानीब्रत माजी आणि बिहारचा पाणिनी या चौघांनी रौप्यपदकाची कमाई केली. पदकतालिकेत भारत आठव्या स्थानी राहिला. इंदोरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक भार्गव वैद्य आणि मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्रितेश रणदिवे यांनी या चमूचं नेतृत्व केलं. पुढची खगोलशास्त्र आणि अंतराळभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा मुंबईत होणार आहे.
Site Admin | August 28, 2024 3:31 PM
१७व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताची १ सुवर्ण आणि ४ रौप्यपदकांची कमाई
