डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ४ पदकं

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी ४ पदकं मिळवली असून त्यात ३ महाराष्ट्रातले आहेत. जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक मिळवलं. मुंबईतल्या अवनीश बन्सलनं रौप्यपदक तर कश्यप खंडेलवालने कांस्य पदक मिळवलं. याखेरीज हैद्राबादच्या हर्षिन पोसीनाला रौप्य पदक मिळालं. सौदी अरेबियामधे रियाध इथं झालेल्या या स्पर्धेत ९४ देशांमधले मिळून ३२७ विद्यार्थी सहभागी झाले होते.