डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना काल भारतानं 23 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावांत संपुष्टात आला. डीऑन माईर्सनं सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 बळी घेतले. मालिकेतील चौथा सामना 13 जुलैला होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.