डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 14, 2024 12:17 PM

printer

टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत भारताची ३-१ आघाडी

भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा २० षटकांचा क्रिकेट सामना आज दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. भारताने या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.

 

मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तत्पूर्वी, काल खेळल्या गेलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर १० गडी राखून मोठा विजय नोंदवला.

 

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने १५२ धावा केल्या. भारतीय सलामीवीरांनी हे लक्ष्य सोळाव्या षटकांतच गाठलं. यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. गोलंदाज तुषार देशपांडे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.