डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारतानं वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला

भारत-वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आज पहिल्याच दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव १६२ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर २ गडी गमावून १२१ धावा केल्या.

 

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. जस्टीन ग्रीव्हच्या ३२ धावा ही त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सामन्यातले ३५ चेंडू बाकी असताना १६२ धावांवर त्यांचा डाव आटोपला. भारतातर्फे मोहंमद सिराजनं ४, जसप्रीत बुमराह ३, कुलदीप यादव २, तर वॉशिंग्टन सुंदरनं १ गडी बाद केला. 

 

त्यानंतर फलंदाजी करताना भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल ३६ धावा करुन बाद झाला. त्याच्या नंतर फलंदाजीला आलेला साई सुदर्शन चांगली कामगिरी करु शकला नाही. तो ७ धावा करुन तंबूत परतला. के एल राहुलनं मात्र दमदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्म केलं. आजचा खेळ थांबला तेव्हा तो ५३ धावांवर, तर कर्णधार शुभमन गिल १८ धावांवर खेळत होता.