भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरु झाला. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे.
सामन्याच्या आज पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ६ बाद २४७ धावा केल्या आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मार्करम आणि रिकल्टन यांनी संघाला ८२ धावांची दमदार सलामी दिली. पण ते एकामागोमाग एक बाद झाले. त्यानंतर स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बवुमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८४ धावांची भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. बवुमा ४२ तर स्टब्स ४९ धावा करून बाद झाला.
आजच्या खेळाच्या ८२ व्या षटकात सिराजनं झॉर्जी याला बाद केलं. हे षटक संपल्यावर अंधूक प्रकाशामुळं खेळ थांबवण्यात आला.