भारत-अमेरिकेमध्ये लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढण्यासाठी सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं अमेरिकेतल्या सरकारच्या लघु उद्योग प्रशासन विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे. दोन्ही देशांमधलं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं हा करार करण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत हे सहकार्य वाढवण्याच्या हेतूनं कौशल्याचं आदानप्रदान करण्याबाबतच्या मुद्द्याचाही या करारात समावेश आहे. महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी तसंच दोन्ही देशातल्या महिला संचलित लघु उद्योगांमधल्या व्यापारी भागीदारीला चालना देण्यासाठी या करारानुसार संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.