भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा पुन्हा सुरु

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर २२ ऑगस्ट २०२५ पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही.