November 2, 2024 10:15 AM

printer

भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सैन्याचा वज्र प्रहार सराव आजपासून सुरू होणार

भारत अमेरिका यांच्या 15व्या संयुक्त लष्करी सराव वज्र प्रहारसाठी भारतीय सैन्य दल काल रवाना झालं. हा सराव आजपासून सुरू होणार असून 22 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत आयडाहो इथं होईल. गेल्या वर्षी हा सराव भारतात मेघालयातल्या उमरोई इथं डिसेंबरमध्ये आयोजित कऱण्यात आला होता.

 

संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त सरावात दोन्ही देशांतले प्रत्येकी 45 जवान असतील. भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व स्पेशल फोर्स युनिट तर अमेरिकेचं प्रतिनिधित्व ग्रीन बेरेट्स करणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.