अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, तीन ते सहा महिन्यानंतर हे नुकसान भरून काढू असा विश्वास मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी आज व्यक्त केला. दागदागिने, कोळंबी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला सध्या या आयात शुल्काचा मोठा फटका बसतो आहे. पण सरकारला या नुकसानीची जाणीव आहे आणि या क्षेत्रातल्या उद्योगांशी सरकारनं चर्चा सुरू केली आहे, असं त्यांनी नमूद केलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या चर्चेचा परिणामही भारत आणि अमेरिका व्यापारावर होईल, असं ते म्हणाले.
Site Admin | August 13, 2025 8:10 PM | India | indian Economy | US
अमेरिकनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काचा मर्यादित परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल – मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन
