भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. १ ऑगस्टपासून हे दर लागू होतील, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज समाज माध्यमांवर जाहीर केलं. रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत असल्याबद्दल अतिरीक्त दंड लादण्याचा इशाराही त्यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. युक्रेनसोबत रशियानं ७ ऑगस्टपूर्वी शस्त्रसंधी केली नाही रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणाऱ्यांवर १०० टक्के दरानं अतिरीक्त कर लादण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला आहे.
जपान आणि युरोपियन महासंघावर १५ टक्के, फिलिपिन्स आणि इंडोनेशियावर १९ टक्के, बांग्लादेशावर ३५ टक्के, थायलंडवर ३६ टक्के आणि मलेशियावर २५ टक्के दरानं कर लादण्याचा निर्णय अमेरिकनं जाहीर केला आहे.