2030 पर्यंत भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढून 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना दिली. अमेरिकेने विविध देशांवर लादलेल्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंता आणि संधी दोन्ही आहेत. भारताने व्यापार उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि अमेरिके सोबत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरु आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
Site Admin | April 16, 2025 9:00 AM | India-US
भारत आणि अमेरिका देशातला व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची आशा
