August 11, 2025 8:11 PM | INDIA Ukraine

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दिमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेनस्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आणि अलीकडच्या घडामोडींबाबत त्यांचा दृष्टीकोन जाणून घेतला. युक्रेन रशिया संघर्षावर लवकरात लवकर आणि शांततापूर्ण मार्गानं तोडगा निघावा, अशी भारताची ठाम भूमिका असल्याचं झेलेनस्की यांना सांगितलं, असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. याबाबत शक्य ते सर्व प्रकारचं योगदान देण्यासाठी, तसंच युक्रेनशी असलेले द्विपक्षीय संबध अधिक मजबूत करण्यासाठी  भारत कटीबद्ध आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.