प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांच्यात मुंबईत द्वीपक्षीय बैठक होणार आहे. कीर स्टारमर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून काल ते मुंबईत दाखल झाले. स्टारमर यांच्यासमवेत व्यापार शिष्टमंडळही आलं आहे. उभय देशांचे प्रधानमंत्री व्हिजन 2035 नुसार दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापक राजनैतिक भागीदारीतल्या प्रगतीचा आढावा घेतील. भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार करारान्वये उपलब्ध संधींविषयी व्यवसाय आणि उद्योग प्रमुखांशी संवाद साधतील. त्याचबरोबर आज मुंबईत होणाऱ्या सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवामध्ये दोन्ही नेते सहभागी होत, उपस्थितांनी संबोधित करणार आहेत.
Site Admin | October 9, 2025 12:23 PM | India UK
मुंबईत भारत-ब्रिटन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा
